ऑकलंड : वृत्तसंस्था
कर्णधार राणी रामपाल हिने लगावलेल्या एकमेव गोलच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने न्यूझीलंड दौर्यातील चौथ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनवर 1-0 अशी मात केली. या सामन्यात राणीने 47व्या सामन्यात भारताला आघाडी मिळवून दिली. हाच गोल सामन्यात निर्णायक ठरला.
या दौर्यातील न्यूझीलंडच्या डेव्हलपमेंट संघाविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून लागोपाठ दोन पराभव स्वीकारावे लागले होते. जोमाने पुनरागमन करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या भारताला सुरुवातीलाच मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा लाभ उठवता आला नाही, पण भारताने बचावात अप्रतिम कामगिरी करीत ग्रेट ब्रिटनला वरचढ होण्याची संधी दिली नाही.
मध्यंतरानंतर गोलशून्य बरोबरी असताना तिसर्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्याचेही गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आले. 47व्या मिनिटाला राणीने ब्रिटनच्या बचावपटूंचे आव्हान मोडीत काढत गोलक्षेत्रात मुसंडी मारली. त्यानंतर आपल्या ताकदवान फटक्याच्या जोरावर ब्रिटनच्या गोलरक्षकाला चकवून सामन्यातील पहिला गोल नोंदवला. याच गोलाच्या जोरावर भारताने ही लढत जिंकली.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …