पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने युवा पर्यावरण संसदचे आयोजन गुरुवारी (दि.13) करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देऊन विधानसभेमध्ये कामकाज कश्या प्रकारे चालते, सकारात्मक चर्चेचे महत्त्व याबाबत माहिती देत समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य सर्वांनी बजावले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी आंतर ‘महाविद्यालयीन पर्यावरण युवा संसद झाली. या संसदेत के. एल. ई कॉलेज, पिल्लेज कॉलेज, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अॅप्स सायन्स, एस. के कॉलजे नेरुळ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातील 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेचे संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संस्थेचे संचालक संजय भगत, स्कूल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी, पनवेल महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख अनिल कोकरे, विद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर, अयुफ अकुला यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
युवा पर्यावरण संसदमध्ये विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक गंभीर समस्यांवर चर्चा करून उपाययोजना सुचविल्या. या संसदेत जलसंधारण, प्रदुषण नियंत्रण, हरित उर्जा, जंगलतोड आणि कचरा व्यवस्थापन या महत्वाच्या मुद्यांवर चर्चासत्र झाले. विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणीय समस्यांवर आधारित आपली मते मांडली आणि शाश्वत पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणारे प्रस्ताव सादर केले.
या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. श्री गडदे यांनी शुभेच्छा दिल्या.
Check Also
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
घरे नियमित करण्याबाबत सिडकोला निर्देश देण्याची आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी …