Breaking News

कोरोनाचा सामना करण्यासाठी जर्मन फुटबॉल संघाचा पुढाकार

20 कोटी रुपये दान करण्याचा घेतला निर्णय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जवळपास दोन लाख 19,033वर पोहचली आहे. कोरोनामुळे 170हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953वर पोहचली आहे. दुसरीकडे 82 हजार 909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणार्‍या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जगभरात तांडव माजवणार्‍या या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी जर्मन फुटबॉल संघाने पुढाकार घेतला आहे. त्यांनी जवळपास 20 कोटी रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
जर्मन फुटबॉल संघाने 2.5 मिलियन युरो म्हणजेच जवळपास 20 कोटी 44 लाख 61,674 रुपये दान करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जग संकटात असताना आपण एकमेकांची काळजी घ्यायला हवी. संघातील सर्व सदस्यांनी चांगल्या कार्यासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जर्मन संघाचा कर्णधार मॅन्यूएल न्यूएर याने दिली. त्याच्यासह जोशूया किमिच, लीओन गोरेत्झ्का आणि मॅटीआस जिंटर यांनीही इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली. ही मदत कोणत्या स्वरूपात असेल याची माहिती मात्र खेळाडूंनी दिली नाही.  
 दरम्यान, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनमधील दी उताह जॅझ या संघातील खेळाडू रूडी गोबर्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला. रूडी सध्या कोरोना विषाणूवर उपचार घेत आहे. उपचार घेताना त्याने या रोगातील रुग्णांसाठी काम करणार्‍या कर्मचार्‍यांची धावपळ जवळून पाहिली आणि त्यामुळेच त्याने मोठा निर्णय घेतला. एनबीच्या या स्टार खेळाडूने कोरोना विषाणूच्या रुग्णांना बर्‍या करणार्‍या संस्थेसाठी पाच लाख अमेरिकन डॉलर म्हणजेत जवळपास तीन कोटी 70 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
रूडी ही मदत तर्ळींळपीं डारीीं केाश -ीशपर आणि कोरोना विषाणूशी संबंधित समाजसेवा करणार्‍या संस्थांना करणार आहे. फ्रान्समधील ओक्लाहोमो शहरातील उताह येथील संस्थांना त्यामुळे फार मोठी मदत मिळणार आहे. 27 वर्षीय रूडी हा कोरोना संक्रमित झालेला पहिला एनबीए खेळाडू ठरला. तो म्हणाला की, कोरोना विषाणूने संक्रमित लोकांना बरे करण्यासाठी जगभरात अनेक लोक झटत आहेत. त्यांची न थकता काम करणारी धावपळ पाहून मी थक्क झालो. विशेषतः माझ्या शहरात उताह येथे आणि फ्रान्समध्ये या रोगाला रोखण्यासाठी झटणार्‍या लोकांची तळमळ मी पाहत आहे. मी माझ्या परीने या विषाणूला रोखण्यासाठी छोटीशी मदत करत आहे, असेही त्याने सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply