Breaking News

कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार

पनवेल ः रामप्रहर वृत्त
एक्सप्रेस फ्रेट रेल्वे कॉन्सोर्टियम प्रकल्पांतर्गत वैतरणा ते जेएनपीटी मार्गावरील कुंडेवहाळ येथील बोगदा खोदण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार पडला असून बोगद्यातील सर्व लाईन टाकण्याचे व इतर काम लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे एमडी प्रवीण कुमार यांनी बुधवारी (दि. 26) कुंडेवहाळ येथे बोगद्याच्या ब्रेक थ्रू सोहळ्यावेळी व्यक्त केला.
कुंडेवहाळ येथील बोगदा वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या जेएनपीटी-वैतरणा सेक्शनमधील एक महत्त्वाचा भाग आहे. हा प्रकल्प जेएनपीटी ते वैतरणापर्यंत सुमारे 102 किलोमीटर लांबीचा आहे. भारताच्या उत्तरी भागाशी मालवाहतुकीचे दळणवळण सुधारण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गामुळे जेएनपीटी आणि भारताच्या उत्तरी प्रदेशातील मालवाहतुकीत मोठी सुधारणा होणार आहे. वाहतुकीचा वेग वाढून लॉजिस्टिक्सच्या खर्चात बचत होणार होईल तसेच पायाभूत सुविधा अधिक मजबूत होणार असून उद्योग आणि व्यापारासाठी उपयुक्त ठरणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर भारताच्या मालवाहतुकीच्या नेटवर्कमध्ये आश्वासक मोठी भर पडणार आहे.
टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनी हे काम करत आहेत, तर सबकॉन्ट्रॅक्टर म्हणून ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अर्थात टीआयपीएल काम करत आहे. त्या अनुषंगाने या प्रकल्पातील महत्त्वाच्या अशा कुंडेवहाळ येथील 169 मीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कुंडेवहाळ येथे टनल ब्रेक थू सोहळा झाला. या वेळी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.चे एमडी प्रवीण कुमार यांनी बटन दाबून या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचे जाहीर केले.
सोहळ्यास डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.चे चीफ जनरल मॅनेजर परमजीत सिंग, टाटा प्रोजेक्ट लि.चे उप्पलपती व्यंकट कुमार, राजकुमार शर्मा, साहिल शर्मा, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, टीआयपीएलचे डायरेक्टर एम.पी. त्यागी, महादेव यादव, प्रकाश पाटील, यल्लालिंग दिगी, कपील कड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या वेळी परेश ठाकूर यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे मालवाहतूक वेगाने होईल आणि नॅशनल लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल. त्यामुळे वाहतूकदारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. टाटा प्रोजेक्ट लि. कंपनीकडे हे काम असून टीआयपीएल सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून योग्य वेगाने काम पूर्ण करीत आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे तसेच पनवेल आणि उरणमध्ये प्रकल्प होत असल्याने याचा फायदा परिसरातील नागरिकांना नक्कीच होईल, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply