लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या उरण द्रोणागिरी येथील इंग्रजी माध्यम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले.
राष्ट्रीय ब्लूम ऑलिम्पियाड स्पर्धेत देशभरातून 25 राज्यांतील 1200पेक्षा आधिक शाळांचा सहभाग होता. स्पर्धेत द्रोणागिरी इंग्रजी माध्यम विद्यालयातील 149 विद्यार्थ्यांनी इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञान (जीके) अशा विविध विषयांची परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यात द्रोणगिरी शाळेची दहावीतील शौर्या प्रदीप पाटील या विद्यार्थिनीने शाळा स्तरावर सुवर्ण आणि राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक पटकाविले आहे. सहावीतील दुर्वा दिनेश जोशी हिने शाळा स्तरावर सुवर्णपदक जिंकले. याव्यतिरिक्त शाळा स्तरावर चार विद्यार्थ्यांना रौप्य आणि सात विद्यार्थ्यांना कांस्यपदक मिळाले आहे.
या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे अभिनंदन केले. या वेळी शकुंतला ठाकूर, विशाल ठाकूर, कमलाकर पाटील, प्रदीप पाटील, नूतन पाटील, प्रथमेश पाटील, योगिता ठाकूर, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा, व्हाईस चेअरमन राजेंद्र नाखवा, स्कूल कमिटी चेअरमन हर्षद कोळी, राजेश नाखवा, मुख्याध्यापिका सोनाली कोळी, उपमुख्याध्यापक डी.सी. पाटील, शिक्षिका रोशनी पाटील, निशिता भगत आदी उपस्थित होते.
Check Also
भारतमाता चित्रपटगृहाशी माझं नातं अगदी वेगळं…
भारतमाता चित्रपटगृहाने छान कात टाकली. ते आजचं झाले.बदल हा होतच असतो, तो व्हायलाही हवा. काही …
RamPrahar – The Panvel Daily Paper