Breaking News

‘एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची स्कॉटलँड वारी’

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रात एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलँड वारी, अशी घणाघती टीका भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. स्कॉटलँडच्या ग्लास्गो येथील पर्यावरण बदल परिषदेच्या निमित्ताने (सिओपी-26) राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे पर्यटन करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भातखळकरांनी टीका केली आहे. एसटी कर्मचार्‍यांचा संप, राज्याला पडलेला प्रदूषणाचा विळखा याकडे दुर्लक्ष करून, स्कॉटलँडला राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे तेथे पर्यटन करीत आहेत. रोम जळत असताना निर्विकारपणे फिडेल वाजवीत बसलेल्या निरोची आठवण यानिमित्ताने येत असल्याची जळजळीत टीका, भातखळकर यांनी केली आहे. महाराष्ट्रात एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी अन् आदित्य ठाकरेंची जनतेच्या पैशावर स्कॉटलँड वारी, अशी स्थिती आल्याचे दिसते आहे. या दौर्‍याचा खर्च आदित्य ठाकरे यांच्याकडून वसूल करावा, अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे. या परिषदेस आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन पर्यटन करण्याचा सपाटा लावला आहे. ठाकरे यांच्यासह अधिकार्‍यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? या संपूर्ण पर्यटन दौर्‍याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा, अशी आग्रही मागणीही भातखळकर यांनी केली आहे. 

आघाडी सरकारच्या बेफिकीरपणाला साजेशी बाब

मुंबईसह राज्यातील आठ शहरांना वायुप्रदूषणाचा विळखा पडलेला आहे. अतिविषारी प्रदूषणामुळे दिवसागणिक शेकडो नागरिक आजारी पडत आहेत. याकडे दुर्लक्ष करून राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे केवळ पर्यटनात मग्न आहेत. ही बाब महाविकास आघाडी सरकारच्या आतापर्यंतच्या बेफिकीर कारभाराला साजेशीच आहे, अशी टीकाही भातखळकर यांनी या वेळी केली आहे.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply