Breaking News

माथेरानमध्ये अश्वशर्यतीचा थरार

कर्जत : बातमीदार

माथेरान म्हटलं की घोडा असे समीकरण पर्यटकांमध्ये असून त्या घोड्यावर रपेट करण्यासाठी माथेरान हे डेस्टिनेशन महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषद व माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वशर्यतीचे आयोजन केले आहे.

यामध्ये आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत, लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले व मुलींसाठी फ्लॅट रेस, पर्यटकांसाठी रिले ट्रोटिंग रेस, सॅडलिंग युअर हॉर्स, टग ऑफ व्हॉर, गॅलपिंग गोल्फ ऑन हॉर्सबॅक, म्युसिकल मग्स ऑन हॉर्स बॅक, टॅट पेगिंग अशा शर्यती घेण्यात आल्या. अतिशय चित्तथरारक शर्यतीचा अनुभव या वेळी पर्यटकांनी घेतला.

  • माथेरान युथ सोशल क्लबच्या माध्यमातून गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त अश्वशर्यतींचे आयोजन केले आहे. यामध्ये आदिवासी, लहान मुले, मुले व मुली जोडीदार, तरुणांसाठी, तसेच खास पर्यटकांना अश्वशर्यतींचे आयोजन करत असतो. यासाठी मुंबई, पुणे येथून घोडेस्वार आपले कसब दाखविण्यासाठी येतात. त्यामुळे पर्यटकांना एक सुखद अनुभव मिळत असतो. खास अश्वशर्यतींसाठी दरवर्षी येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त असते.

-प्रदीप दिवाडकर, संस्थापक अध्यक्ष

  • माथेरानमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात येण्यासाठी असे साहसी खेळ सुरू करण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करून माथेरान हे महत्त्वाचे डेस्टिनेशन कसे होईल याकडे आम्ही विचार करणार आहोत.

-प्रसाद सावंत, गटनेता

  • मनमोहक निसर्ग, गर्द हिरवी झाडी यामुळे माथेरान भुलवते, पण येथील अश्वशर्यतींच्या थरारामुळे आम्ही पूर्ण भारावून गेलो आहोत. यामुळे जेव्हाही माथेरानला अश्वशर्यती असतील तेव्हा आम्ही माथेरानला आवर्जून येऊ. -आशिष वंजारे, पर्यटक मुंबई

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply