Breaking News

पेण-वडखळ मार्गावर वाहतूक कोंडी

पेण : अनिस मनियार  : उन्हळ्याची सुट्ट्या त्यात शनिवार व रविवारी आल्याने मुंबई – गोवा महार्गावर पर्यटकांच्या गाड्यांची संख्या वाढल्यामुळे पेण-वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे  मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातून मुरुड, अलिबाग, नागाव बीच तसेच कोकणातील समुद्र किनार्‍यांचा आस्वाद घेण्यासाठी कुटुबिंयांसमावेत निघालेल्या पर्यटकांना पेण ते वडखळ मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. यामुळे   पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले.

 मुंबई- गोवा महामार्गावरील पळस्पे, कर्नाळा खिंड, खारपाडा, तरणखोप, जिते, उचेडे, रामवाडी, वाशीनाका, पेण रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी महामार्ग रुंदिकरणाची कामे सुरु असून, काही ठिकाणी ओव्हरब्रीज, काही ठिकाणी मोरीचे काम सुरु आहे. त्यामुळे कोकणात जाणार्‍या गाड्यांची तरणखोप बायपास, रामवाडी ब्रिज, वडखळनाका येथे वाहतूक कोंडी होत असते. शनिवार, रविवारी वडखळ ते पेण हे सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होेता. त्यामुळे पर्यटकांचे हाल झाले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply