पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधून दोन महिला सायकलने युरोपला जाणार आहेत, त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर
यांनी शुभेच्छा दिल्या आणि 50 हजार रुपयांची मदत केली आहे. यामध्ये वंदना महेंद्र भावसार आणि अजिता बाबूराज या 58 वर्षीय महिला 1350 किलोमीटरचा युरोपचा सायकल प्रवास करणार आहेत.
21 ते 28 जून 2025 दरम्यान, नेदरलँड, बेल्जियम आणि पॅरिस आणि 8 ते 20 जुलै 2025 या कालावधीत जर्मनी ते ऑस्ट्रिया असा सायकल प्रवास त्यांचा होणार आहे. महिलां सक्षमीकरणाचा संदेश, शून्य कार्बन फूटप्रिंट – जगाला वेगळ्या दृष्टीने पहा या टॅगलाइनसह स्व-समर्थित सायकलिंग करणार आहेत. या पूर्वी या दोघी मैत्रिणींनी संपूर्ण भारतात आणि देशाबाहेरही सायकलिंग केले आहे.
दरम्यान, त्यांनी शनिवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट घेतली. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वंदना महेंद्र भावसार आणि अजिता बाबूराज यांना 50 हजार रुपयांची मदत करून त्यांच्या प्रवासाला
शुभेच्छा दिल्या.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper