माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा गोष्टींची या स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (दि. 19) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत एकूण 109 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
पनवेल शहरातील गोखले सभागृहात झालेल्या या स्पर्धेला प्रमुख मान्यवर म्हणून माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हा नेते श्रीनंद पटवर्धन, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंझारराव, महिला मोर्चा अध्यक्ष रूचिता लोंढे, भाजप पनवेल मंडळ सरचिटणीस अमित ओझे, प्रितम म्हात्रे, पवन सोनी, मंगेश अपराज, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, रोहित जगताप, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, वैभव बुवा आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन युवा मोर्चाचे अनिमेष ओझे, रूद्र पाटील, अभि रिंगे, शिवराज बोबडे, प्रथम दासरी, आशुतोष पाटील, प्रथम ठाकरे, कोमल कोळी, अनिमेष पटवर्धन, आकाश गाडे, हिमांशु पाटील, निखिल जोगळेकर, हर्षल बहाडकर यांच्या वतीने करण्यात आले होते.
इयत्ता पाचवी ते दहावी अशा गटात झालेल्या या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्याला प्रत्येकी तीन हजार रुपये, द्वितीय तीन हजार रुपये, तृतीय एक हजार रुपये, तर उत्तेजनार्थ पारितोषिकास पाचशे रुपये आणि सर्व बक्षीसपात्र विजेत्यांना व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप होते. संतांची कथा, बोधकथा, अकबर बिरबल कथा व इसापनीतीच्या कथा या विषयावर ही स्पर्धा झाली.
विविध गटात झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक अथश्री जोशी, तारुण्य बीडवी, महेंद्र पोहराम, आर्या कडू, हिमांशू परमार; द्वितीय क्रमांक ध्रुव जाधव, अमर विश्वकर्मा, स्वरा भिसे, प्रिन्स वाकोडे, अधिशेष घुगरे; तृतीय क्रमांक चिन्मयी भिडे, पारस लुहार, आशियान अन्सारी, सोनाक्षी दालवाले, गौरी शिंदे; तर उतेजनार्थ पारितोषिक मयुरी काकोडिया, आर्यन प्रजापती, अबीर बावळे, राज सरोज आणि कनिष्का सुराते यांनी पटकावला. परीक्षक म्हणून प्रिती धोपाटे यांनी काम पहिले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.
RamPrahar – The Panvel Daily Paper