एखादा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टीमवर्क आवश्यक असते. हाती घेतलेले काम मार्गी लागण्यास सांघिक प्रयत्नांनी मदत होते. त्याची प्रचिती सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणार्या आरोग्य महाशिबिरात येते.
महाशिबिराच्या नियोजनासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू, निमंत्रण, स्वागत, विविध रोग तपासणी, परिवहन, डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यक समन्वय, औषधे वाटप, भोजन अशा विविध 24 समित्या कार्यरत झाल्या आहेत. प्रत्येक रुग्णाची ने-आण करण्यापासून त्याची वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत तपासणी होऊन त्यांना औषधोपचार मिळावे, तसेच भोजन व अन्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी या समित्या काम पाहणार आहेत. या समित्यांची जबाबदारी वाटून घेण्यात आली असून, ही मंडळी रुग्णांना सेवा देण्यास तत्पर असणार आहेत. त्यामुळे रुग्णांना महाशिबिराचा लाभ घेणे निश्चितपणे सुकर होईल.