नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांवर होणारा अन्याय आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न वरिष्ठ पातळीवर पोहचवण्यासाठी आवाज इंडिया टीव्ही चॅनेल काम करेल, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वाशी येथे चॅनेलच्या शुभारंभावेळी केले.
आवाज इंडिया टीव्ही चॅनेलने ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता या चॅनेलचे नवी मुंबई आणि रायगड परिसरात पदार्पण झाले आहे. यानिमित्त वाशी येथे गर्जा महाराष्ट्र या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करून चॅनेलचा शुभारंभ सोहळा रविवारी झाला.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते चॅनेलचे उद्घाटन झाले असून त्यांनी या वेळी आवाज इंडिया टीव्ही चॅनेलच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत हे चॅनेल समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
या वेळी माजी राज्यमंत्री अविनाश म्हातेकर, आरपीआयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश बारशिंग, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक, सामाजिक कार्यकर्ते निशांत भगत, आरपीआयचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख महेश खरे, आवाज इंडिया मराठी टीव्ही चॅनेलच्या संपादक राही भिडे, ब्युरो हेड योगेश महाजन, पीआर प्रतिनिधी विलास भोसले, विनोद पार्टे, हाजी शहनवाज खान, विलास चव्हाण आदी उपस्थित होते.
Check Also
अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या
आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांची विधिमंडळात मागणी मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील अवकाळी पाऊस, …
RamPrahar – The Panvel Daily Paper