पनवेल : रामप्रहर वृत्त
दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे 75 व्या वर्षात पदार्पण अर्थात अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दर महिन्याच्या पहिल्या रविवारी रक्तदान शिबिर उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा खालापूर मंडळाच्या वतीने रविवार, 7 सप्टेंबर रोजी खालापूर तालुक्यातील वावर्ले येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्ष पदापर्णानिमिताने विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रायगड जिल्ह्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी एक विशेष रक्तदान उपक्रम सुरु करण्यात आले आहे. त्यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबविण्यात येणार असून, विशेषतः थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी आणि इतर गरजू रुग्णांसाठी या रक्तदान उपक्रमाचे मोठे योगदान ठरणार आहे. आतापर्यंत पनवेल, खारघर आणि खांदा कॉलनी येथे हे शिबीर यशस्वी आयोजन आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.
वावर्ले येथे होणारे हे शिबीर मालिकेतील चौथे असून अधिक माहितीसाठी मनोज पारठे 9096189555, निखिल पाटील 708313100, भरत मांडे 8898173235, किंवा स्वप्निल ठोंबरे 9209876295 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper