पनवेल ः रामप्रहर वृत्त
न्हावा-शेवा वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकार्यांसोबत शुक्रवारी (दि. 26) बैठक झाली. या वेळी संबंधित विषयांवर सखोल चर्चा झाली.
या बैठकीस पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड सरचिटणीस तथा माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत वाढीव न्हावा-शेवा पाणीपुरवठा योजना टप्पा-3 या योजनेत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या योजनेमुळे पनवेल महापालिकेला प्रति दिन 228 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper