Breaking News

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पेणला धावती भेट

विविध घटकांच्या समस्या घेतल्या जाणून

पेण : प्रतिनिधी
चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कोकण दौर्‍यावर आलेले माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सहकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 12) रात्री परतत असताना पेण येथे भेट दिली. या वेळी त्यांनी वादळग्रस्तांसह गणपती कारखानदार आणि नाभिक संघटनेच्या समस्या जाणून घेतल्या.
निसर्ग चक्रीवादळाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार प्रसाद लाड, आमदार निरंजन डावखरे आदी नेत्यांनी कोकणाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर परतत असताना त्यांनी आमदार रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी भेट दिली.
नगराध्यक्ष प्रीतम पाटील, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, बंडू खंडागळे, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, कामगार आघाडीचे कोकण अध्यक्ष विनोद शहा, अलिबाग तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, अजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.
या वेळी भाजप नेत्यांनी गणपती कारखानदार, नाभिक संघटना आणि चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदन स्वीकारले. नुकसान झालेल्यांना भरीव मदत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्राचे पथक मंगळवारी (दि. 16) रायगड व रत्नागिरीत पाहणी करून नुकसानीचा आढावा घेणार आहे.
मुख्यमंत्र्यांना करून दिली परिस्थितीची जाणीव
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवस कोकणाचा दौरा केल्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अद्याप कोकणात एक रुपयाचीही मदत मिळाली नसल्याचे म्हटले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply