Breaking News

माझ्या विजयात रामशेठ ठाकूर यांचा मोलाचा वाटा -बारणे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप कार्यकर्त्यांचेही मानले आभार

पनवेल ः प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी विशेष मेहनत घेणारे आणि पनवेलमधून 54 हजार मतांची आघाडी मिळवून देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. 27) पनवेल येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आभार मानले.

भाजप, शिवसेना, आरपीआय मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी दिलेल्या शब्दाप्रमाणे चार पावले पुढे जात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा रायगड भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन पनवेल विधानसभा मतदारसंघातून तब्ब्ल 54 हजार मतांची आघाडी मिळवून देत विजयाचा मार्ग सुकर केला. त्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा पुनश्च सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की, मावळ लोकसभा मतदारसंघातून देशाच्या लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन आपण मला सहकार्य केले आहे. शिवसेना-भाजप-मित्रपक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून प्रचंड मताधिक्यांनी निवडून दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. मला पुन्हा एकदा मावळ लोकसभेतील जनतेची सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर आपण दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवेन. मतदारसंघाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही देऊन महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. आपण व आपल्या सहकार्‍यांनी अहोरात्र मेहनत केल्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले सहकारी, मित्रपरिवार, कार्यकर्ते तसेच आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे, अशा शब्दांत खासदार बारणे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आणि पदाधिकार्‍यांचे आभार मानले. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, ‘अ’ प्रभाग समिती सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, समीर ठाकूर, डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विकास घरत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा नगरसेविका मुग्धा लोंढे, नगरसेविका दर्शना भोईर, शिवसेनेचे विधानसभा संघटक दीपक निकम, भाजपचे युवा नेते राजेश गायकर, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, निलेश पाटील, जगदिश घरत, सुशांत मोहिते, अभिषेक पटवर्धन, गणेश वाघिलकर, सचिन गायकवाड, अमरीश मोकल, भास्कर शेट्टी, दीपक शिंदे, विजय पाटील, मनोहर मुंबईकर, अनेश ढवळे, सुनील खळदे, सपना पाटील यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply