Breaking News

पनवेलमधील जनतेचा गणेशोत्सव होणार गोड

  • तब्बल 60 हजार कुटुंबांसाठी अन्नधान्य
  • श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपचा स्तुत्य उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त
गोरगरिबांच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणारे दानशूर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 60 हजार कुटुंबांना गणेशोत्सव गोड करण्यासाठी अन्नधान्य दिले जाणार आहे.
कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनमुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. या परिस्थितीत गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचनच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या एक लाख 25 हजारांहून अधिक जणांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर 90 हजारांपेक्षा जास्त नागरिकांना तांदूळ, गोडेतेल, तूरडाळ, कांदे, बटाटे, साखर आदी अन्नधान्य देऊन कोरोनाच्या संकटकाळात आधार देण्यात आला. याशिवाय एक लाखाहून अधिक नागरिकांना मास्क, रोगप्रतिकारशक्ती वाढविणार्‍या गोळ्या, सॅनिटायझर देण्यात आले. कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा तत्परतेने झाली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व सहकारी कोविड रुग्णालयांशी समन्वय साधून रुग्णांच्या उपचारामध्ये जातीने लक्ष घालत आहेत.
लॉकडाऊन लागू झाल्यापासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल भाजपच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची विविध प्रकारे सेवा करून सर्वतोपरी मदत सुरू झाली. हा ओघ आजतागायत चालूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवात ग्रामीण व शहरातील 60 हजार कुटुंबांना साखर, मैदा, तूप, गूळ, चणाडाळ व रवा या धान्याचे एकत्रित पॅकेट दिले जाणार आहे. या व्यवस्थेचा लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आढावा घेतला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply