Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोलीत जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन

कळंबोली ः रामप्रहर वृत्त
जनसंपर्क कार्यालयांच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचे निराकरण झाले पाहिजे. नागरिकांना अपेक्षित असलेला विकास करण्यासाठी कटीबद्ध होऊयात, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे केले.
भाजपचे कळंबोलीतील युवा नेते अमर ठाकूर यांनी आणि महिला मोर्चाच्या कळंबोली शहर सरचिटणीस सरस्वती काथारा यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयांचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 15) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
उद्घाटन समारंभास कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, शिवसेनचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, जिल्हा चिटणीस रविशेठ पाटील, उपाध्यक्ष गणेश कडू, कळंबोली शहर अध्यक्ष अमर पाटील, नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, महिला मोर्चाच्या कळंबोली शहराध्यक्ष मोनिका महानवर, माजी नगरसेवक रवींद्र भगत, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, अशोक मोटे, सित्तू शर्मा, युवा नेते हॅप्पी सिंग, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, प्रभाग 10चे अध्यक्ष रामा माहनवर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
सर्वसामान्यांची तळमळीने कामे करणारा, नागरिकांच्या समस्या दूर करणारा आणि समाजकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असणारा कार्यकर्ता म्हणून अमर ठाकूर यांची ओळख आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी काढले; तर एखाद्या वाघिणीप्रमाणे सरस्वती काथारा या जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचे काम करतात, अशा शब्दांत त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
सरस्वती काथारा यांनी कळंबोलीत दोन ठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. त्यांनी ही कार्यालये जनतेच्या समस्या मांडण्याचे हक्काचे ठिकाण असेल. आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवू, अशी ग्वाही दिली.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply