पनवेल : रामप्रहर वृत्त
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेनेचे जिल्हा अध्यक्ष गौरांग जेठवा यांच्यासह पनवेल शहरातील अनेक कार्यकर्ते व सहकार्यांनी सोमवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, भाजप पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, माजी नगरसेवक अजय बहिरा, प्रभाकर बहिरा, तसेच पवन सोनी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मनसेचे नेते गौरांग जेठवा यांच्यासोबत राजेश चौधरी, मानव पुंजारा, सुदेश घरत, प्रणित म्हात्रे, संतोष गोळे, शुभम नांद्रेकर, साईराज बताळे, भार्गव ठाकूर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जेठवा यांनी भाजपच्या नेतृत्वावर आणि पक्षाच्या विकासाभिमुख धोरणावर विश्वास व्यक्त करत सामान्य कामगार, युवक आणि स्थानिक प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करता यावे म्हणून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper