Breaking News

युको रिक्षाचालकांची दादागिरी; योग्य भाडे आकारण्याची मागणी

रसायनी : प्रतिनिधी

राष्ट्र राज्य मार्ग परिवहन खात्याच्या बेजबाबदारपणामुळे प्रवासी ग्राहकांना युको रिक्षावाले यांच्याकडून भुर्दंड पडत असल्याचे चित्र दिसत आहे. युको रिक्षा सुरू झाल्यापासून प्रवासी ग्राहक यांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. त्याचबरोबर युको रिक्षामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध झाला आहे, मात्र युको रिक्षा यांची दादागिरी सुरू झाली आहे, असे चित्र खपनवेल-खोपोली प्रवास करणारे प्रवासी यांना जाणवत आहे.

खालापूर, पनवेल ते खोपोली प्रवास करताना फक्त खोपोलीचे प्रवासी घेतले जातात, मात्र दांडफाटा  ते खालापूर येथील प्रवासी यांनाही खोपोली एवढेच भाडे आकारले जाते. कधी काळी प्रवास करणारे त्यांना माहीत नसते, ते भाडे देतात, मात्र या भागातील अनेक प्रवासी रोज खोपोली-पनवेल किंवा चौक, वावंढळ, दांडफाटा असाही प्रवास करणारे आहेत. रोज त्यांना प्रवासी भाडे देणे परवडत नसल्याचे ते सांगतात, पनवेल इथून खोपोली फाटा किंवा त्या दरम्यानच्या ठिकाणी उतरायचे असेल, तर खोपोली फाटा एवढेच भाडे द्यावे लागते, हे अन्यायकारक आहे. याबाबत आरटीओने लक्ष घालावे अशी मागणीही प्रवासी करत आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply