Breaking News

माथेरानमधील कपाडिया मार्केटचे छप्पर कोसळले

कर्जत : बातमीदार

माथेरानमधील कपाडिया मार्केटमधील ब्रिटिशकालीन मटण मार्केटचे छप्पर सोसाट्याच्या वार्‍याने पडले, मात्र रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली.

माथेरानमधील कपाडिया मार्केटमध्ये भाजी मंडई, मच्छी व मटण मार्केटचा समावेश आहे. 1919मध्ये या कपाडिया मार्केटची निर्मिती करण्यात आली होती. 100 वर्षे उलटूनही हे मार्केट स्थानिकांसह पर्यटकांना भुरळ घालत होते. लाल दगडाच्या भिंती, पत्र्याची उतरती छपरे, समसमान गाळे ही या मार्केटची वैशिष्ट्ये आहेत. येथील मटण मार्केटचे लोखंडी छप्पर बुधवारी

(दि. 30) रात्री सोसाट्याच्या वार्‍यामुळे कोसळले. लोखंडी खांब गंजल्यामुळे ते ठिसूळ झाले होते. याबाबत मटण मार्केटमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी नगरपालिकेत मार्केटची पुनर्निर्मिती करावी, असा अर्ज दिला होता. त्या अनुषंगाने नगरपालिकेने या हेरिटेज मार्केटचे काम करण्यास सुरुवातही केली होती. तोच या मार्केटचा एक भाग कोसळल्यामुळे या मार्केटमधील काही मटण दुकाने बंद केली आहेत. 

 या मार्केटमध्ये माझा वडिलोपार्जित मटणविक्रीचा धंदा आहे. या मार्केटच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे, पण हे काम संथगतीने सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी  नितीन खांगटे यांनी केली आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply