Breaking News

आज नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ; मान्यवरांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवन सज्ज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भाजपने देशात अभूतपूर्व यश मिळवूून सलग दुसर्‍यांदा सत्ता आपल्याकडे राखली. त्यामुळे पंतप्रधानपदाचा शपथविधीही विजयानुसार मोठा होणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रपती भवन प्रथमच एकावेळी सहा हजारांहून अधिक पाहुण्यांचा पाहुणचार करणार

असल्याचे समजते.

मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी सहा हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीदेखील शपथ घेणार आहेत. भाजपच्या मोठ्या विजयानंतर भव्यदिव्य शपथविधी सोहळ्याची कल्पना अनेकांनी केली होती, मात्र राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शपथविधी सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सोहळ्यासाठीच्या नियोजनातील अधिकार्‍याने सांगितले की, या क्षणाचे महत्त्व जाणून हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने व लक्षात राहण्यासारखा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

शपथविधी सोहळा राष्ट्रपती भवनाच्या बाहेरच्या प्रांगणात होणार आहे. मुख्य रस्ता व मुख्य भवन यांच्या मध्यभागी भव्य रस्ता तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याचा वापर विविध देशांतील नेते व राज्यातील प्रमुखांसाठी करण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलऐवजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पंतप्रधानांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्याची ही चौथी वेळ आहे.  या सोहळ्यासाठी 14 देशांतील प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रादेशिक व राष्ट्रीय पक्षांच्या प्रमुखांव्यतिरिक्त अनेक वरिष्ठ नेत्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply