Breaking News

उरणमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात निर्विवाद बहुमत मिळाल्याने भाजपमध्ये विविध पक्षकार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पुन्हा एकदा सुरू झाला आहे. याच धर्तीवर उरण येथील शेतकरी कामगार पक्षाच्या नऊ कार्यकर्त्यांनी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपत प्रवेश केला.

या वेळी भारतीय जनता पक्षाचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, पालिका उपनगर अध्यक्ष जयविन कोळी, भाजप रायगड जिल्हा वाहतूक संघटना अध्यक्ष सुधीर घरत, उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष नारायण नाखवा, उरणचे माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, भाजप युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शेतकरी कामगार पक्षाचे हरेश्वर भास्कर म्हात्रे, चेतन नामदेव गावडे, राजेंद्र शांताराम ठाकूर, संदेश धनाजी गावंड, मयूर महादेव गोडमुखले, मितेश मधुकर गावंड, अश्विन दिनकर गावंड, अनिकेत दिनकर गावंड, सचिन धनाजी गावंड आदी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप गाव अध्यक्ष संतोष बाळकृष्ण गावडे, शेतकरी समिती अध्यक्ष देविदास अनंत म्हात्रे, युवा मोर्चा अध्यक्ष सोपान बाळाराम गावंड, युवा नेता सनी सुरेश म्हात्रे, राजेंद्र धर्मा म्हात्रे आणि महादेव मर्‍या थळी यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply