रस्त्याच्या कामासाठी मानकुले ग्रामस्थ बांधकाम कार्यालयासमोर एकवटले
अलिबाग ़: प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील शिरवली – मानकुले रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी मानकुले ग्रामस्थांनी गुरूवसरी (दि.21) सार्वजनिक बांधकम विभागाच्या अलिबाग येथील कार्यालयात धरणे आंदोलन केले.
अलिबाग तालुक्यातील शिरवली – मानकुले रस्त्याची दूरवस्था झाली आहे. 4 जानेवारी 2017 रोजी या रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामाची निविदा निघाली. हे काम एका वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र दोन वर्ष झाली तरी काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. गुरुवारी या ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धरण आंदोलन केले.
सरपंच सुजित गावंड, उपसरपंच पल्लवी पाटील, रमाकांत म्हात्रे, पंचायत समितीचे सदस्य उदय काठे, राजेश पाटील, शैलेश महाडिक आदी यावेळी उपस्थीत होते. येत्या सोमवारपासून या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल व हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन बांधकाम विभागने दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
आंदोलन थांबविण्यात आले तरी रस्त्याच्या कामात दिरंगाई दिसून आली तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात यईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिली आहे.