Breaking News

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या पथकाची शिळफाटा येथे कारवाई, पावणेसहा लाखांचा साठा हस्तगत; दोघे ताब्यात

पनवेल ः वार्ताहर

अमली पदार्थविरोधी कक्ष गुन्हे शाखेच्या पथकाने तळोजा परिसरातील शिळफाटा येथून जवळपास पाच लाख 89 रुपयांचा अमली पदार्थ, रोख रक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. अमिन जाल मोहम्मद खान व बदरली इर्शाद अहमद शेख यांच्याकडे मेथाक्युलॉन हा अमली पदार्थ त्यांच्याकडे असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्ष गुन्हे शाखा यांना मिळताच वपोनि बी. एस. सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय शिंगे, हवालदार रमेश उटगीकर आदींच्या पथकाने रूबी मार्केट गेटजवळ गुरूदत्त देव मंदिरासमोर छापा टाकून मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या या दोघा इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास पाच लाख 89 रुपयांचा अमली पदार्थ, रोख रक्कम व इतर ऐवज असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply