अलिबागमध्ये कार्यकर्त्यांची मोटरसायकल रॅली; भाजप कार्यालयाजवळ थेट प्रक्षेपण
अलिबाग : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदो यांनी गुरूवारी (दि. 30) पंतप्रधानपदाची दुसर्यांदा शपथ घेतली. त्यावेळी रायगडात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अलिबागमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून आनंद व्यक्त केला. शपथविधीचे थेट प्रक्षेपण पहाता यावे, म्हणून अलिबाग येथील भाजप कार्यालयाजळ मोठा पडदा लावण्यात आला होता. शपविधीचे प्रक्षेपण पाहण्यासाठी आलिबागकरांनी गर्दी केली होती.
गुरुवारी सायंकाळी अलिबाग येथील भाजप कार्यालयाजवळून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. संपूर्ण शहारात ही रॅली फिरली. भाजपचे आलिबाग – मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष हेमंत दांडेकर, शहर अध्यक्ष सुनिल दामले, पंचात समिती सदस्य उदय काठे, परशुराम म्हात्रे, सतीश लेले, राजेश पाटील, संतोष पाटील, विकास काठे, अॅड. पल्लवी तुळपुळे, शोभा जोशी आदी या मोटारसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.