Breaking News

पंचायत समिती शेष फंड अंतर्गत अपंग कल्याण निधीचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त : गव्हाण पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या पंचायत समिती शेष फंडांतर्गत अपंग कल्याण निधीचे वाटप नुकतेच करण्यात आले. न्हावा, गव्हाण, तरघर, उलवा या ग्रामपंचायत हद्दीतील अपंगांना गव्हाण ग्रामपंचायत हॉलमध्ये धनादेशाचे वाटप पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, ग्रामसेवक एम. डी. पाटील, ग्रा.पं. सदस्य विजय घरत, योगिता भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

सन 2018-19 मधील शेष फंडांतर्गत 29 अपंगांना अपंग कल्याण निधीचे वाटप झाले. या सर्वांना त्यांच्या बँक खात्यात सर्व निधी जमा करण्यात आला होता, परंतु ज्यांच्या खात्यात निधी जमा होऊ शकला नाही त्या सहा जणांना गव्हाण ग्रामपंचायत हॉलमध्ये धनादेश सुपूर्द करण्यात आले. यामध्ये 40 टक्केपर्यंत अपंगत्व असलेल्यांना व्यवसायवाढीसाठी 10 हजार रुपये, तर 75 ते 100 टक्के अपंगत्व असलेल्यांना निर्वाह भत्ता म्हणून 12 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. ‘चालू वर्षी म्हणजेच 2018-19 साठी 29 जणांना या निधीचे वाटप केले गेले, तर गेल्या वर्षी याअंतर्गत 19 जणांना अपंग कल्याण निधीचे वाटप झाले होते,’ असे पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी अधिक माहिती देताना सांगितले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply