Breaking News

आपल्या आशीर्वादामुळेच यशस्वी झालो

उपमहापौर विक्रांत पाटील यांनी मानले मतदारांचे आभार

पनवेल : वार्ताहर : 26 मे 2019 रोजी म्हणजेच 5 दिवसांपूर्वी मला आपल्या प्रभागाचा ‘नगरसेवक’ म्हणून निवडून येऊन दोन वर्षे पूर्ण झाली. आपण भरभरून दिलेले प्रेम व आशीर्वाद यामुळेच मी संघर्षपूर्ण निवडणुकीत यश संपादित करू शकलो व नगरसेवक होऊ शकलो याची मला संपूर्ण जाणीव आहे. म्हणूनच पनवेल महानगरपालिकेचा पहिला पुरुष उपमहापौरपदाचा बहुमान मला प्राप्त होऊ शकला, असे म्हणत उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, नगरसेवक शब्दातील ‘सेवक’ हा शब्द लक्षात ठेवून निवडून आल्याच्या लगेच दुसर्‍याच दिवसापासून मी प्रभागातील कामाला सुरुवात केली. रस्त्यांचे प्रश्न, गटारे, उद्याने, दिवाबत्ती सोय, आरोग्यविषयक प्रश्न, शैक्षणिक विषय, प्रशासकीय कामे अशा एक ना अनेक प्रश्नांना हात घालत जनतेसाठी काम करण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न गेली दोन वर्ष मी केला आहे. त्यातील अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत तर काही कामे प्रगतिपथावर आहेत, तसेच अनेक नवीन कामे नियोजनात आहेत. मी अभिमानाने सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षांत आपल्या प्रभागात सर्वात जास्त विकासकामे मंजूर करून घेण्यात मी यशस्वी होऊ शकलो.

माझ्यापर्यंत आलेली प्रत्येक समस्या मी स्वतः लक्ष देऊन सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. शहरात पाणी समस्या गंभीर असली, तरी आपल्या प्रभागात त्याचा कमीत कमी त्रास नागरिकांना होईल यासाठी व्यवस्थित पाणी सोडून घेण्यापासून ते गरज पडल्यास रात्री तीन-चार वाजेपर्यंत टँकर पुरवण्यापर्यंत सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला. गेल्या दोन वर्षात अनेक छोट्या-छोट्या विषयांवर काम केले आहे व त्याचा रिझल्ट पुढील दोन वर्ष आपणास दिसेल. आपले प्रेम, शुभेच्छा यामुळेच प्रभागासाठी काहीतरी चांगले करण्याची ऊर्जा मला प्राप्त होत असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply