Breaking News

तळोजा सब-वेचे काम तातडीने पूर्ण व्हावे

पनवेल : प्रतिनिधी : पनवेल महापालिका हद्दीतील तळोजा फेज 1 येथील रेल्वे सब-वेचे काम दोन वर्षे धिम्या गतीने सुरू असल्याने या भागातील वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे. या कामाला गती देण्याची मागणी तेथील सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केली आहे.

तळोजा फेज 1 या ठिकाणी शहरात प्रवेश करण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे तळोजा फेज 1 येथील रेल्वे फाटक आहे.  या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली असताना रहदारीसाठी हा एकच मार्ग उपलब्ध आहे. एकदा रेल्वेचे फाटक पडले की 30 ते 40 मिनिटे लोकांना थांबावे लागते. यामुळे लांबच्या लांब वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे नोकरदार वर्ग वेळेवर कामावर पोहोचू शकत नाही व इतर लोकांनाही त्याचा त्रास होतो. याशिवाय गंभीर बाब अशी की एखादा रुग्ण अत्यवस्थ असल्यास तो वेळेवर दवाखान्यात पोहोचू शकत नाही.

या परिस्थितीमुळे शहरातील नागरिक खूप त्रस्त आहेत. अनेक वेळा लगतचा कळंबोली कल्याण हायवेदेखील ब्लॉक होऊन जातो. या रस्त्याला पर्याय म्हणून सबवेचे काम चालू आहे, परंतु गेली दोन वर्षे हे काम अतिशय संथगतीने चालू आहे. पावसाळा सुरू झाला की काम बंद करावे लागते. वर्षाचे काही महिने हे काम सुरू असते. त्यामुळे हा सब-वे उपलब्ध होण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply