पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल शहरातील गरिबांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रभाकर गांधी यांची प्राणज्योत गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मालवली.
डॉ. प्रभाकर गांधी संपूर्ण तालुक्यात गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात. राजकारणात असूनदेखील गरिबांसाठी कोणताही पक्ष, वा जात-पात-धर्म न बघता वयाच्या अखेरपर्यंत त्यांनी सेवा केली. ते समाजवादी विचारश्रेणीत वाढले होते. 1975च्या आणीबाणीत त्यांना सहा महिन्यांचा कारावासही भोगावा लागला होता. त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
– एक अतिशय सज्जन, निस्वार्थी आणि गोर-गरिबांसाठी सर्वस्वाचा त्याग करणारा डॉक्टर म्हणून परिचित असणारे समाजवादी विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले.
-लोकनेते रामशेठ ठाकूर