Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतले विविध देवींचे दर्शन

पनवेल ः नवरात्रोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात सुरू आहे. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यातील वाकडी, खानाव, शिवकर, मोहे, कामोठे, नवीन पनवेल, पनवेल परिसरात आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवांना रविवारी भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष एकनाथ देशेकर, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ भोपी, तालुका उपाध्यक्ष के. के. म्हात्रे, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती क चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, दिलीप पाटील, विजय चिपळेकर, विकास घरत, संतोष शेट्टी, नगरसेविका कुसुम म्हात्रे, संतोषी तुपे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच तालुक्यातील पाले येथील गावदेवी मंदिरातील सप्ताहाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply