Breaking News

स्थानिक शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे ध्येय

पनवेल : प्रतिनिधी

टाटा स्टील बीएसएलने (आधीची भूषणस्टील) रायगड जिल्ह्यातील आपल्या कंपनीच्या आजूबाजूच्या भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लासेस सुरू केले आहेत.

शिक्षण क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लर्निंग इम्प्रुव्हमेंट बायवे ऑफ व्हायब्रन्ट एज्युकेशन-लाईव्ह या उपक्रमांतर्गत हे स्मार्ट क्लासेस सुरू करण्यात आले आहेत. एका आधुनिक पद्धतीने प्रभावी शिक्षणप्रणालीचा वापर करून शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण कमी करणे आणि शिकवण्याच्या नवनवीन पद्धती आणून या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सावरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, केटीएसपी सावरोली हायस्कूल आणि स्वामी विवेकानंद स्कूल या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. टाटा स्टील बीएसएलने चार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व तीन सरकारी अनुदानावर चालविण्यात येत असलेल्या हायस्कूल्समध्ये ई-लर्निंग व्यवस्था प्रदान केल्या आहेत.

सात स्थानिक शाळांमधील जवळपास 1200 विद्यार्थ्यांना या लाईव्ह प्रोग्रॅमचे लाभ मिळत आहेत. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आम्ही इतरही अनेक उपक्रम सुरू करणार आहोत. आमच्या उपक्रमांना मुलांकडून मिळत असलेला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे.

-कपिल मोदी, एक्झिक्युटिव्ह प्लांटहेड, टाटा स्टील बीएसएल, खोपोली

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply