Breaking News

पनवेल ते मानखुर्द रस्त्यालगत 11 हजार वृक्षांचे रोपण

पनवेल : प्रतिनिधी

गुरू नानक देव यांच्या 550 व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली केएलई कॉलेज समोर एक्स्प्रेस महामार्गालगत वृक्षारोपण करण्यात आले.

यंदा गुरुनानक देव यांचे 550वे जयंती वर्ष आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र शीख असोसिएशनच्या वतीने पनवेल ते मानखुर्द पर्यंत 11 हजार वृक्षांचे रोपण करण्यासोबत त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कळंबोली येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.या वेळी शीख असोसिएशनचे अध्यक्ष दलजित सिंग बल, उपाध्यक्ष जसपाल सिंग, नगरसेवक राजेंद्र शर्मा, भाजपचे प्रदेश सदस्य सुभाष कदम, कळंबोली भाजप शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवा नेते हॅपी सिंग, तालुका उपाध्यक्ष अशोक मोटे, ट्रान्सपोर्ट सेलचे प्रदेश अध्यक्ष अमरजीत सिंग, तालुकाध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र बनकर, मनीष अरबट, प्रकाश शेलार, देविदास खेडकर, विलास किठे, ज्ञानेश्वर घाडगे यांच्यासह कार्यकर्ते आणि शीख बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या पनवेल महापालिकेला प्रशस्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या …

Leave a Reply