Breaking News

म्हसळ्यातील प्राथमिक शिक्षक पगाराविना

जि.प. शिक्षण, पं.स. अर्थ विभागात समन्वयाचा अभाव

म्हसळा : प्रतिनिधी

पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकांना 1जूनपर्यंत पगार द्यावेत, असे शासनाचे आदेश असतानाही, रायगड जि.प.चा शिक्षण विभाग आणि पं.स.चा अर्थ विभाग यांच्यातील असमन्वयामुळे म्हसळा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना 10 जून उजाडला तरीही पगार मिळालेला नाही.

वास्तविक अन्य विभागांतील कर्मचार्‍यांप्रमाणेच प्राथमिक शिक्षकांचे वेतनही दर महिन्याच्या एक तारखेला होणे अपेक्षित आहे. यावेळी तर रमजान व इद यांच्या पार्श्वभूमीवर 1जूनपर्यत प्राथमिक शिक्षकांना पगार द्यावेत, असे राज्याच्या शिक्षण संचालकांचे पत्र  होते. मात्र 10 तारीख उजाडली तरीही म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांच्या हाती पगाराची रक्कम पडलेली नाही. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि म्हसळा पंचायत समितीचा अर्थ विभाग यांच्यात योग्य समन्वय नसल्याने तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना पगाराविना दिवस काढावे लागत आहेत. उशिरा मिळणार्‍या वेतनामुळे ऐनवेळ दुसर्‍यांपुढे हात पसरण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे.

पावित्र रमजान व इदनिमीत्त प्राथमिक शिक्षकांना 1 जूनपर्यंत पगार द्यावेत, असे शासनाचे स्पष्ट आदेश असल्यामुळे जिल्ह्यांतील प्राथमिक शिक्षकांसाठी 40 कोटी व केंद्रप्रमुखांसाठी 11 कोटी रुपयांचा रेमीटन्स केला आहे.

 -भाऊसाहेब थोरात, प्र. शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

मागील दोन महिने एलआयसी शेड्यूल्डचे निमित्त करीत पगार काढण्यास विलंब होत आहे. हक्काच्या वेतनासाठी शिक्षकांना लढा किंवा तक्रार द्यावी लागणे हे उचित नाही.

-नितीन मालीपरगे, अध्यक्ष, शिक्षक परिषद-म्हसळा तालुका

तांत्रिक बाबी असल्या तरी त्याचा फटका शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसणे योग्य नाही. इदीपुर्वी पगार मिळणे आवश्यक होते.

-जनाब कौचाली, अध्यक्ष, अखील भारतीय उर्दू शिक्षक संघटना-म्हसळा

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply