Monday , February 6 2023

दोन गजलसंग्रहांचे प्रकाशन

पनवेल : वार्ताहर

येथील गजल ग्रुपच्या वतीने नुकतेच दिवाकर वैशंपायन यांचे ‘अमृत मंथन’, तसेच डॉ. अविनाश पाटील यांचे ‘माहौल’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख उपस्थित होते. त्याचबरोबर कोमसापचे दत्तात्रेय सैतवडेकर, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण सहसंचालक रोहिदास पोटे, ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. मनीषा बनसोडे, डॉ. मंदार माईणकर, डॉ. सुभाष कटकदौंड, डॉ. सुबोध नवरीकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप बोडके यांनी केले. पुस्तक प्रकाशनानंतर उपस्थित मान्यवर वक्त्यांनी दोन्ही पुस्तकांवर अभ्यासपूर्ण मते मांडली. या वेळी झालेल्या कविसंमेलन व मुशायर्‍यामध्ये आबिद मुन्शी, प्रभाकर गोगटे, सुनीती साठे, सदानंद रामधरणे, संजीव शेट्ये, सतीश अहिरे, संदीप बोडके, गणेश म्हात्रे, माधुरी थळकर, रवींद्र सोनावणे, पूजा नाखरे, रंजना करकरे, सागरराजे निंबाळकर, अनिल कांबळे, चित्रपट दिग्दर्शक कवी सचिन आवटे, सुरेश कुलकर्णी, नागनाथ डोलारे, नमिता जोशी, अरुषी दाते, शिवाजी मोटे आदी कवी-गजलकारांनी सहभाग घेतला. गजलकार समीर शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर रोहिदास पोटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply