Breaking News

सावळे सरपंचपदी भाजपचे शिवाजी माळी

पनवेल : रामप्रहर वृत्त

सावळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे शिवाजी माळी यांनी शेकापच्या ज्योती केदारी यांच्या पराभव करीत सरपंचपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानिमित्त उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच शिवाजी माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

सावळे ग्रामपंचातीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी निडवणूक झाली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे शिवाजी माळी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या ज्योती केदारी यांचा पराभव करीत दणदणीत विजय मिळवला. या वेळी भाजप नेते तानाजी खंडागळे, माजी सरपंच संतोष माळी, अविनाश गाताडे, विद्यमान उपसरपंच सुजाता माळी, देवळोलीच्या सरपंच मनस्वी भंडारकर, माजी उपसरपंच अश्विनी कुरंगळे, एम. डी. माळी, सदाशिव माळी, विजू माळी, विजय कुरंगळे, गणपत केदारी, बळीराम कांबळे, रामचंद्र केदारी, रामभाऊ पाटील, गजानन बडवी, काशीनाथ कांबळे, सुनील माळी, राम गाताडे, किरण केदारी, भालचंद्र म्हस्कर, सीताराम माळी, विनोद कांबळी, बाळाराम केदारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी नवनिर्वाचित सरपंच शिवाजी माळी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply