नवी दिल्ली ः केंद्र सरकारने 2022-23 या वर्षासाठी रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. 8) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोहरीच्या एमएसपीमध्ये 400 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ केली आहे. यामुळे मोहरीची एमएसपी पाच हजार 50 रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे. हरभरा आणि मसूरच्या एमएसपीमध्ये मोठी वाढ झाली असून हरभर्याच्या दरात प्रति क्विंटल 130 रुपये, तर मसूरच्या दरात 400 रुपये वाढ केली आहे. यामुळे हरभर्याची एमएसपी पाच हजार 230 रुपये, तर मसूरची एमएसपी पाच हजार 500 रुपये प्रति क्विंटल इतकी झाली आहे. याशिवाय सरकारने वस्त्रोद्योग क्षेत्रासंदर्भातही काही घोषणा केल्या आहेत.
Check Also
अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती
भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …
RamPrahar – The Panvel Daily Paper