रोहे ः प्रतिनिधी
शहरासह ग्रामीण भागात पावसाने चांगली सुरूवात केली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या पावसाचा आनंद लुटत असतानाच सर्वांचीच पावसाळ्यापुर्वीची कामे उरकण्याची लगबग सुरु झाली आहे.
रोह्यासह तालुक्यातील मेढा, यशवंतखार, सानेगाव, घोसाळे, चणेरा आदी भागांत पावसाने दमदार सुरुवात केली. हवेतील गारव्याबरोबरच गेली दोन दिवस रोहा तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दिवसभर हजेरी लावल्यानंतर रोह्यात रात्रीही पाऊस पडला. गुरुवारी सकाळी काही काळ सूर्यनारायणाचे दर्शन झाल्यानंतर रोह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे नागरिकांनी छत्रीसह रेनकोट बाहेर काढले होते.