Tuesday , March 28 2023
Breaking News

खोपोलीत मराठा समाज भवन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन

खोपोली : प्रतिनिधी

नाईक मराठा मंडळाच्या नेतृत्वाखाली व लोकवर्गणीतून खोपोलीत अडीच कोटींचा प्रस्तावित खर्च असलेले भव्य मराठा भवन साकारत असून, त्याचे भूमिपूजन बुधवारी (दि. 20) रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

मराठा भवन पुढील एक वर्षात निर्माण करण्याचा मंडळाचा संकल्प असून, त्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकत्रितपणाने सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केले, तसेच या कार्यात डिजिटल मीडिया, वेबसाईट आदींचा वापर करावा, जेणेकरून जिल्हा, राज्य व देशाबाहेर असलेले खोपोली-खालापुरातील यात आर्थिक मदत करतील, असेही ना. चव्हाण यांनी सुचविले.

या समारंभास खासदार श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर, स्थानिक आमदार सुरेश लाड, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मराठा सभागृहासाठी आर्थिक व इतर आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले.

नाईक मराठा मंडळाचे अध्यक्ष विनोद साबळे यांच्या नेतृत्वाखाली मराठा भवन उभे राहत आहे. हे भवन 10 गुंठे दान मिळालेल्या जागेत तीन मजली भव्य इमारतीत उभे राहणार असून, यात मराठा समाजातील गरजूंना त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम, तसेच सभा कमीत कमी मोबदल्यात घेता येतील, असे साबळे यांनी सांगितले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, जि. प.चे आरोग्य व शिक्षण सभापती नरेश पाटील, गटनेते सुनील पाटील, मुख्याधिकारी संजय शिंदे, पोलीस निरीक्षक के. एस. हेगाजे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक, नगरसेविका, मराठा समाजाचे बंधू-भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे चिटणीस ह.भ.प. दिगंबर सणस व सूत्रसंचालन रवींद्र घोडके यांनी केले; तर आभार उतेकर यांनी मानले.

Check Also

30 मार्चपासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचाही प्रत्यक्ष सहभाग नागपूर : प्रतिनिधी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून …

Leave a Reply