Breaking News

टीम इंडियाला पुरेशा सुविधा नाहीत; बीसीसीआयची नाराजी

लंडन : वृत्तसंस्था

पावसामुळे चार सामने रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियोजनावर टीका होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय संघाची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली त्यात पुरेशी सुविधाच उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणे नसल्यानं खेळाडूंना व्यायामासाठी प्रायव्हेट जिममध्ये जावं लागत आहे.

‘हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणं नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना प्रायव्हेट जिममध्ये जावं लागत आहे. त्यामुळे त्यांना तंदुरुस्ती राखण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे,’ अशी माहिती सूत्रांनी दिली. या एकाच समस्येचा खेळाडूंना सामना करावा लागत नाही, तर असे अनेक प्रश्न सतावत आहेत. ‘लंडनमध्ये एक चांगलं हॉटेल मिळणं अवघड झालं आहे. ज्यात अत्याधुनिक जिम, स्विमिंग पूल, एअर कंडिशनल रूम गरजेचे आहे. इंग्लंडने याचा विचार करायला हवा,’ असेही सूत्रांनी सांगितले.

भारतीय संघाचा चाहतावर्ग लक्षात घेता सुरक्षिततेचे प्रश्नही भेडसावत आहेत. ‘सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवली पाहीजे. खेळाडूंना भेटण्यासाठी अनेक चाहते हॉटेलभवती घोळका करून असतात. त्यामुळे खेळाडूंना ट्रेनऐवजी बसने प्रवास करावा लागत आहे. त्याने त्यांचा वेळही खर्ची जात आहे,’ अशा अनेक समस्यांचा पाढा वाचण्यात आला. आयसीसीने या सर्व गोष्टींची काळजी घ्यायला हवी, असे मत बीसीसीआयच्या अधिकार्‍याने व्यक्त केले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply