Breaking News

सरफराजचे “नाचता येईना अंगण वाकडे”

मॅन्चेस्टर : वृत्तसंस्था

यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना 16 जूनला खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. टीम इंडियाला अनुकूल अशा खेळपट्ट्या आयसीसीने बनवल्याचा आरोप सरफराज अहमदने केला आहे.

वर्ल्डकपमध्ये सरफराज पाकिस्तानच्या टीमला मिळणार्‍या खेळपट्ट्यांवर नाराज आहे. आम्हाला मिळणार्‍या खेळपट्ट्या खेळासाठी अनुकूल नसतात, असं सरफराजचं म्हणणं आहे. तसंच भारताला आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी बॅट्समन आणि स्पिनरना मदत मिळणार्‍या खेळपट्ट्या दिल्या जातात. अशा खेळपट्ट्या आशियाई टीमना अनुकूल असतात, अशी तक्रार सरफराजने केली आहे. टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये पहिले दक्षिण आफ्रिका आणि मग ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानचा 41 रननी पराभव झाला. या मॅचमधल्या खेळपट्टीवरही सरफराजने आक्षेप घेतले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फास्ट बॉलरना मदत मिळणार्‍या उसळी जास्त असणार्‍या खेळपट्टीवर खेळायला लागल्याचं सरफराजचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानचा फास्ट बॉलर मोहम्मद आमिरने 5 विकेट घेतल्या. यामुळे कांगारूंचा संघ 49 ओव्हरमध्ये 307 रनवर ऑलआऊट झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान 45.4 ओव्हरमध्ये 266 रनवर ऑलआऊट झाला. याआधी वेस्ट इंडिजविरुद्ध उसळी मारणार्‍या विकेटवर पाकिस्तानचा संघ 105 रनवर ऑलआऊट झाला होता.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने 4 पैकी 1 सामना जिंकला, तर 2 गमावले आहेत आणि 1 सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पाकिस्तानच्या खात्यात सध्या 3 पॉईंट असल्यामुळे ते आठव्या क्रमांकावर आहेत. तर टीम इंडियाने या वर्ल्ड कपमध्ये 3 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत, तर 1 मॅच पावसामुळे रद्द झाली आहे. 5 पॉईंट्ससह टीम इंडिया तिसर्‍या क्रमांकावर आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply