पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाकडी, उमरोली, उसर्ली खुर्द, पाली देवद, वाजे, वलप, सावळे, हरिग्राम, पाले बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी भाजपच्या उमेदवारांनी मंगळवारी (दि. 29) तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज पंचायत समितीमध्ये दाखल केले.
राज्यभरात ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. त्यात पनवेल तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी भाजपने अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारीही भाजपच्या उमेदवारांनी आपले अर्ज पनवेल पंचायत समितीमध्ये निवडणूक अधिकार्यांकडे दाखल केले.
या वेळी भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह उपाध्यक्ष संजय पाटील, सुभाष जेठू पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, नगरसेवक बबन मुकादम, युवा नेते रोहित घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …