पनवेल : अभिनेता सलमान खान बिईंग ह्युमन ट्रस्टच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून संदीप टेमकर यांना वैद्यकीय उपचारार्थ 20 हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. टेमकर हे नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार घेत असल्याने मदतीचा धनादेश नगरसेवक राजू सोनी यांनी भाजप शहर उपाध्यक्ष भीमराव पोवार यांच्याकडे सुपूर्द केला.
