श्रीवर्धन : प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे आणि डीआयईसीपीडी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्ली येथील प्राथमिक शाळेत श्रीवर्धन तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी दोन दिवशीय तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यात आली.
स्पीच नोट हे नावीन्यपूर्ण आणि उपयोगी अॅप आहे. त्याच्या सहाय्याने आपण अगदी कमी वेळामध्ये भरपूर लिखाण करू शकतो. या अॅपचा शिक्षकांना निश्चित फायदा होईल, असे सांगून प्रशिक्षण तज्ज्ञ समीर सय्यद यांनी स्पीच नोट आणि दीक्षा अॅपच्या संदर्भात सखोल माहिती दिली. या तंत्रस्नेही कार्यशाळेत सुधीर निकम, नदाफ भाईजान या प्रशिक्षण तज्ज्ञांनी, तसेच गटशिक्षण अधिकारी नुरमोहम्मद राऊत यांनीही मार्गदर्शन केले.
विषय सहाय्यक (उर्दु विभाग) बशीर उलडे, विषयसाधन व्यक्ती गणेश सावंत, डीआयईसीपीडीचे श्री. वेखंडे (पनवेल) यांच्यासह श्रीवर्धन तालुक्यातील 47 प्राथमिक शिक्षक या कार्यशाळेत सहभागी झाले होते.