Breaking News

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने आयओसीची भारतावर कारवाई

पुणे : प्रतिनिधी

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विविध स्तरांवर पाकिस्तानचा निषेध होत असताना नेमबाजी विश्वचषकासाठी भारतात येणार्‍या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओसी) भारताला 14 कोट्यांसह नेमबाजी विश्वचषक आयोजित करण्याची परवानगी दिली आहे, मात्र भविष्यात कुठल्याही ऑलिम्पिक आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत भारतावर बंदी घातली आहे. आयओसीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला.

पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली होती.

आयओसीकडून यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, भारतीय एनओसी, आयओसी आणि आयएसएसएफने अखेरपर्यंत प्रयत्न केले, मात्र तरीही पाकिस्तान संघाला स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही मार्ग निघू शकला नाही. ही परिस्थिती कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करण्याच्या आयओसीच्या मूळ चार्टरच्या विरोधात जाणारी आहे. त्यामुळे भारतात यापुढे होणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाला स्थगिती देत आहोत. जोपर्यंत भारताकडून ऑलिम्पिक चार्टरचे पालन होण्याबाबत लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply