Breaking News

विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
सध्याच्या पिढीवर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असून हा संस्काराचा वारसा सातत्याने पुढे चालत राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विचुंबे येथे छत्रीवाटप आणि निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात केले.
भारतीय जनता पक्ष विचुंबेच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विचुंबे, देवद आणि उसर्ली वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून नुकतीच निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम सोमवारी (दि. 18) रायगड जिल्हा परिषदेच्या विचुंबे येथील शाळेत झाला.
या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, देवदचे सरपंच विनोद वाघमारे, गावाध्यक्ष के.सी. पाटील, माजी सरपंच बळीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य आरती गायकवाड, श्रावणी भोईर, विभूते सुरते, प्रगती गोंधळी, अनंता गायकवाड, व्ही.डी. पाटील, माई म्हात्रे, अक्षदा गायकवाड, भाग्यश्री भोईर, हर्षदा भिंगारकर, नीलम भिंगारकर, ज्योती भोईर, माजी उपसरपंच किशोर सुरते, अविनाश गायकवाड, रवींद्र भोईर, जगदीश भोईर, डी.के.भोईर, संजीत भिंगारकर, गुरूनाथ म्हात्रे, हनुमान भोईर, गुड्डू भोईर, अनिकेत गायकवाड, सुरज सुरते यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटप करण्यात आले.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply