पनवेल : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील उसर्ली येथील प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन पेस सेंटरमध्ये इलेक्ट्रिकल व ऑटोमोटिव्ह या कौशल्य विकासाचे प्रशिक्षण पूर्ण करणार्या युवक-युवतींना नुकतेच प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. पेस सेंटरमध्ये दोन कोर्सचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. या कोर्ससाठी होल्टास कंपनी सहकार्य करीत आहे. यामध्ये केवळ प्रशिक्षण न देता त्यांना नोकरीसाठी सहकार्य करण्यात येते. या प्रशिक्षणासाठी रायगड, ठाणे, पालघर ता तीन जिल्ह्यांतून गरीब व गरजू युवक-युवती सहभागी झाले होते. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याने त्यांचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम नुकताच उसर्ली येथे झाला. या कार्यक्रमास जीएसटी अधिकारी राहुल शेवाळे, अट्रस्ट्रीक फाऊंडेशन कामोठेचे अध्यक्ष विजय चव्हाण, इलेक्ट्रिकल प्रमुख संजय शिंदे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक इलेक्ट्रिकल विभाग मेंटॉर अजित अभिमेषी यांनी केले. पेसच्या व्यवस्थापिका माधुरी शिंदे यांनी संस्थेच्या कार्याची माहिती सांगून उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत विद्यार्थ्यांनी तयार केलेले शोभेचे दिवे देऊन केले. मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षकांना टूल किट्स व प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यक्रमासाठी 200 युवक-युवती उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश भगत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पेस सेंटरमधील सर्व स्टाफने मेहनत घेतली.