Breaking News

विंडिजचा संघ मैदानात आल्यावर राष्ट्रगीताऐवजी वाजविले जाते गाणे

मँचेस्टर : वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सामना सुरु होण्याआधी प्रत्येक देशाचे राष्ट्रगीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्डकपमध्ये खेळत असली तरी तो एका देशाचा संघ नाही. कॅरेबियन प्रदेशात विविध बेटे आहेत. त्या बेटांनी मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार झाला आहे. वेस्ट इंडिज म्हणजे अनेक देशांचे मिळून कॉन्फिडरेशन संघराज्य आहे.

वेस्ट इंडिज हा एक देश नसल्यामुळे त्यांच्या सामन्याआधी कुठले राष्ट्रगीत वाजवले जाते, असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो? वर्ल्डकपसह आयसीसीच्या स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजचा सामना सुरु होण्याआधी डेव्हिड रुडर यांचं ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या गाण्याचा स्वीकार केला आहे.

डेव्हिड रुडर हे कॅरेबियन प्रदेशातील यशस्वी कलाकार आहेत. त्रिनिदाद येथे रहाणारे डेव्हिड रुडर यांनी 1988 साली ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गाणे लिहून संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सर्व भावना असल्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने राष्ट्रगीताच्या जागी या गाण्याचा स्वीकार केला. गाण्यामधून लोकांना एकत्र येऊन वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply