Breaking News

राजर्षि शाहू महाराज यांची जयंती साजरी

पनवेल ः भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात क्रांतीचे प्रवर्तक राजर्षि शाहू महाराज यांची 145वी जयंती बुधवारी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. या वेळी पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते शेखर शेळके, बेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच भरत पाटील, कराडे खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य विजय मुरकुटे, सतीश पाटील, योगेश पाटील, आनंद ढवळे, पांडुरंग केणी, तुलसीराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

राज्यातील जलप्रदूषणाच्या गंभीर प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांचा विधिमंडळात आवाज

मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जलप्रदूषणाच्या समस्येमुळे नद्या, तलाव, धरणे, खाड्या, भूजल तसेच किनारी भागांच्या पर्यावरणावर …

Leave a Reply