Breaking News

‘स्माईल प्लस’ने आणले मनोरुग्णांच्या चेहर्यावर हास्य

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणार्‍या आठ जणांची सुटका पुण्याच्या स्माईल प्लस फाऊंडेशनने पोलिसांच्या मदतीने केली. आठपैकी चार जण मनोरुग्ण असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्याने त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेणार्‍यांविरोधात पोलीस काय कारवाई करणार, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात हजर केले असता चार मनोरुग्णांची रवानगी ठाणे येथील मनोरुग्णालयात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

राज्यासह इतर राज्यातून भटकत पेणमध्ये आलेल्या काही व्यक्तींना आपल्या घरातील कामासाठी राबविण्याचा प्रकार पेणच्या पिंपळपाडा गावात अनेक वर्षांपासून सुरू होता. विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या माहितीनंतर त्याची खबर दिल्यावर पेण पोलिसांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन त्यांची सुटका केली. पिंपळपाडा येथील एका गोठ्यात तीन वर्षांपासून मनोरुग्णांकडून जबरदस्तीने काम करवून घेतले जात असल्याची माहिती स्माईल प्लस फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश मालखरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकार्‍यांसह तेथे धाव घेतली. त्यानंतर मालखरे यांनी पेण पोलिसांच्या मदतीने तेथील आठ लोकांची सुटका केली. दरम्यान, महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यातील व्यक्ती भटकंती करीत पेणमध्ये आल्यानंतर या भटक्या बेवारस व्यक्तींना आपल्या गाई-म्हशींच्या गोठ्यात कामाला ठेवून तेथे त्यांच्याकडून अतिश्रमाचे काम करून घेतले जात होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply